पालखी निघाली पायी, त्यात बसले साई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:12 PM2020-01-11T23:12:12+5:302020-01-12T01:22:15+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखीचे शिर्डीकडे वाजत-गाजत साईनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. ...

The palanquin left, and Sai sat in it | पालखी निघाली पायी, त्यात बसले साई

शिर्डीकडे निघालेल्या साई पालखीत सहभागी झालेले पिंपळगाव परिसरातील साईभक्त.

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जय अंबिका साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

पिंपळगाव बसवंत : येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखीचे शिर्डीकडे वाजत-गाजत साईनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. यावेळी माजी सरपंच भास्कर बनकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
दरवर्षाप्रमाणे यावर्षी या पालखी पदयात्रोत येथील साईभक्तांनी सहभाग नोंदवला आहे. मिरवणुकीत पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. सजवलेल्या पालखीतील साईबाबांची मूर्ती, उंट, घोडे, रथ आकर्षण ठरले. संजय मिंदे, सतीश बनकर, नितीन बनकर, देवेंद्र काजळे, सुरेश साळुंके, अल्पेश पारख आदी पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. या पालखीत उद्धवराजे शिंदे, राजेंद्र सोनवणे, लहू गवळी, प्रकाश पिठे,भाऊसाहेब पिठे, दिलीप पिठे, राजेंद्र बेजेकर, संजय गवळी, राजेंद्र वाघमारे, हरी रोकडे, संदीप जाधव, तुकाराम गांगुर्डे, विजू सोनवणे, दीपक बेंडकुळे, हिरामण घोरपडे, किरण घुगे, किरण वाघमारे, सागर कोकाटे, गोपीनाथ गहिले, जगदीश चोथवे, भागवत गहिले, टिलू टोंगारे, हिरामण चोथवे, सुनील जाधव, विजय गहिले, पिंटू वाघमारे आदी सहभागी झाले आहेत.
येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने पाच वर्षांपासून सार्इंच्या दर्शनासाठी पदयात्रा काढण्यात येते. परिसरातील शेकडो भाविक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. साईनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमते. भाविकांच्या सुरक्षेची काळजी मंडळाच्या वतीने घेण्यात येते. साईबाबांच्या दर्शनानंतर पदयात्रेतील शीणभाग दूर पळतो. तसेच शहराच्या शांततेसह शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या दु:खाचे निवारण करण्याचे साकडे आम्ही साईबाबांना घालतो.
- उद्धवराजे शिंदे, अध्यक्ष, जय अंबिका मित्रमंडळ

Web Title: The palanquin left, and Sai sat in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.