पालखेड मिरचीचे येथे भरली बालजत्रा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:21 PM2019-02-13T17:21:06+5:302019-02-13T17:22:27+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते.
बालगोपालासाठी आयोजित या कार्यक्र मात दिवसभर विविध करमणुकीचे कार्यक्र म संपन्न झाले विविध स्पर्धेत लहान मुलांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवित या बालजत्रेत आनंद घेतला.
संघर्ष ग्रुप व एस एस अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बालजत्रेचे उद्घाटन सरपंच रवींद्र कोकाते, उपसरपंच लक्ष्मी थेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती राजेश पाटील, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस सतीश मोरे, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, माजी सभापती पंडित आहेर, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघ, बसपा तालुका अध्यक्ष योगेश गांगुर्डे, बसपा शहराध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी समीर थेटे, प्रमोद सासवडे, मनोज लोंढे, महेश निकम, राजेश थेटे, एकनाथ गांगुर्डे, सागर निरभवणे, सचिन गांगुर्डे, शिवराज थेटे, ज्ञानेश्वर थेटे, रईस शेख, गौतम हिरे, प्रकाश थेटे, श्रीकांत हिरे, संतोष आहेर, संदीप काळे, शाम चौधरी, गोरख गाडे, केशव शिंदे, दीपक झेंटे, दिनेश जगताप सह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शालेय जीवनात विध्यार्थ्यंना गायन, नृत्याची आवड निर्माण होऊन व भारतीय कलासंस्कृती टिकून राहावी यासाठी या बालजत्रेचे आयोजन केले होत.े आणि दरवर्षी अशा बालजत्रेचे आयोजन केले जाईल.
- प्रमोद सासवडे.
संघर्ष ग्रुप व एस एस अकॅडमी. (फोटो १३ पालखेड, १३ पालखेड १)