पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:23 AM2018-08-05T01:23:42+5:302018-08-05T01:24:42+5:30

निफाड : तालुक्यातील पालखेड गावाजवळून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडले असून, सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सदर घटनेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असून, अधूनमधून पाऊसही पडत आहे. त्यातच वडनेरभैरव-दावचवाडी-निफाड या मार्गावर पालखेड गावाजवळ डाव्या कालव्यावर असणाºया पुलाच्या पश्चिमेकडील कठड्याजवळ एक भगदाड पडले आहे.

 Palkhed bridge on the left canal break | पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड

पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक : अवजड वाहतुकीमुळे अपघाताची भीती

निफाड : तालुक्यातील पालखेड गावाजवळून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडले असून, सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सदर घटनेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असून, अधूनमधून पाऊसही पडत आहे. त्यातच वडनेरभैरव-दावचवाडी-निफाड या मार्गावर पालखेड गावाजवळ डाव्या कालव्यावर असणाºया पुलाच्या पश्चिमेकडील कठड्याजवळ एक भगदाड पडले आहे.
पूर्ण क्षमतेने आवर्तन सुरू असल्याने पुलाच्या खालून वाहणारे पाणी लागून भगदाड मोठे होत आहे. या मार्गावरून पालखेड, शिरवाडेवणी, वडनेरभैरव, निफाड, दावचवाडी, कुंभारी या गावांसाठी वाहतूक होते. कालव्यावरील पूल आधीच अरु ंद असून एका बाजूला भगदाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भगदाड वाढत गेल्यास त्याचा पुलालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कालव्यावरील पुलाचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तात्पुरती उपाययोजना नकोपरिसरात राहणारे ज्ञानेश्वर आहेर यांनी हे भगदाड पाहिल्यानंतर पाटबंधारे विभागाला त्याची माहिती दिली. सदरचा रस्ता बांधकाम विभागाकडे असल्याने त्यांनी संबंधित विभागाला खबर दिली. ज्या ठिकाणी भगदाड पडले आहे तेथे बांधकाम विभागाने दगड ठेवून पांढरे सर्कल करत धोका असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कालव्यावरील पूल छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी असताना पिंपळगाव बसवंत येथील महामार्गाचा टोल वाचविण्यासाठी अवजड वाहने या पुलावरून ये-जा करत असतात. त्यामुळे अधिकच धोका वाढला आहे.

Web Title:  Palkhed bridge on the left canal break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalwaकळवा