पोलीस बंदोबस्तात पालखेड डाव्या कालव्याला विसर्ग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:45 PM2019-03-14T15:45:46+5:302019-03-14T15:46:12+5:30
लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे.
लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे. मनमाड व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठ्यावर असलेल्या गावांसाठी असलेल्या साठवण तलावातील पाणी संपुष्टात आल्याने गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. एक हंड्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने पालखेड धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पालखेड धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी दिंडोरी, निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्दच्या पुढे येवला व मनमाडच्या दिशेने निघाले आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारची पाणी चोरी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी ठराविक अंतरावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यालगत असलेला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.