पाण्यासाठी हंडा मोर्चा, रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 07:20 PM2018-12-30T19:20:15+5:302018-12-30T19:20:28+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीवर अवलंबून असणार्या खेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याकारणाने आजमितीला पाण्याचा प्रश्न स्थानिक प्रशासनामार्फत सोडवण्यात यावा या करिता व तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी फाटा येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.
माळवाडी : पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीवर अवलंबून असणार्या खेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याकारणाने आजमितीला पाण्याचा प्रश्न स्थानिक प्रशासनामार्फत सोडवण्यात यावा या करिता व तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी फाटा येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाप्रमुख गोटू आबा आहिरे व संदीप बागुल, आबा गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माळवाडी गावांमधील पुरु ष महिला यांनी हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली
होती. यावेळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको वाहतूक सुरळीत करण्यासाठी व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आंदोलनस्थळी धाव घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यावेळी माळवाडी ग्रामस्थ आबाजी खैरनार, मधुकर खैरनार, महेंद्र पवार, देवमन माळी, त्रंबक माळी आदी उपस्थित होते.