जिल्ह्यात टॅँकरने गाठली पंचविशी

By admin | Published: April 20, 2017 01:18 AM2017-04-20T01:18:09+5:302017-04-20T01:18:25+5:30

नाशिक : लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे झुकत प्रशासनाने दहा टॅँकर मंजूर केल्याने जिल्"ात २५ टॅँकरद्वारे ५२ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.

Panchavashi reached by tanker in the district | जिल्ह्यात टॅँकरने गाठली पंचविशी

जिल्ह्यात टॅँकरने गाठली पंचविशी

Next

नाशिक : उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मागणी वाढू लागली असून, लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे झुकत अखेर प्रशासनाने दहा टॅँकर मंजूर केल्याने जिल्"ात २५ टॅँकरद्वारे ५२ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
नाशिक जिल्"ात गेल्या आठवड्यापासून तपमानात कमालीची वाढ झाली असून, ग्रामीण भागातील नद्या, नाले कोरडे पडले तर विहिरींनीही तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत पाण्याची मागणी वाढली असून, पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी गावोगावी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत. एक तर धरणांतून पाणी सोडा किंवा टॅँकर तरी सुरू करा यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जात आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असून, पाणीपुरवठा योजनाही कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पाण्यासाठी नागरिकांची भटकंती टाळण्यासाठी टॅँकरची मागणी वाढली आहे. मात्र प्रशासनाने टॅँकरबाबत असलेले धोरण पाहता अखेर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने टॅँकर सुरू करण्यास प्रशासन राजी झाले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पंधरा टॅँकरद्वारे जिल्"ातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. मंगळवारी मात्र चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर, येवला, बागलाण या पाच तालुक्यांसाठी दहा टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे टॅँकरच्या संख्येने पंचविशी गाठली आहे. गेल्या वर्षी १९ एप्रिल रोजी जिल्"ातील ४२० गावे, वाड्यांसाठी १४६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Web Title: Panchavashi reached by tanker in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.