पंचवटी, आडगाव शिवारात दोन फिरस्त्यांचा बुडून मृत्यू

By नामदेव भोर | Published: May 10, 2023 05:01 PM2023-05-10T17:01:11+5:302023-05-10T17:01:20+5:30

मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या सुमारास गांधी तलावाच्या कडेला रामकुंड येथे निसाळ यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. 

Panchavati, Adgaon Shivara two children drowned | पंचवटी, आडगाव शिवारात दोन फिरस्त्यांचा बुडून मृत्यू

पंचवटी, आडगाव शिवारात दोन फिरस्त्यांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

नाशिक : शहरातील गोदावरी नदीपात्रात रामकुंडाजवळील गांधी तलावात एका फिरस्त्याचा मृतदेह आढळून आला असून सावित्रीबाई फुलेनगर , दुर्गानगर भागातील पाटातही एका फिरस्त्याच्या मृतदेह तरंगताना आढळून आल्याने पंचवटी, आडगाव परिसरात या मृत्यूंविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुंडाजवळील गांधी तलावात बुडून परप्रांतीय फिरस्त्याचा मृत्यू झाला. राजाराम नेपाळ निसाळ(३५,मूळ रा. भागलपूर, राज्य बिहार, सध्या रा. फिरस्ता पंचवटी) असे मृताचे नाव असून मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या सुमारास गांधी तलावाच्या कडेला रामकुंड येथे निसाळ यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. 

महिला पोलिस शिपाई रोहिणी भाईर व गवळी या रामकुंड, गंगाघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गांधी तलावाजवळील गोल घुमट येथे लोकांची गर्दी दिसल्याने त्यांनी माहिती घेतली. यावेळी निसाळ यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

पाटात बुडून फिरस्त्याचा मृत्यू
आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील सावित्रीबाई फुलेनगर, दुर्गानगर येथील ठोंबरे यांच्या घरासोरील पाटात एका फिरस्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याची अद्याप ओळख पटलली नाही मात्र , पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविला असून आडगाव पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसली तरी त्याचे वय ५० ते ५५ वर्षापर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिस हवालदार डापसे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Panchavati, Adgaon Shivara two children drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक