पंचवटी अमरधाम : डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:47 AM2018-08-27T00:47:24+5:302018-08-27T00:47:57+5:30

पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनी बसवू नये, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येऊन डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे.

 Panchavati Amardham: Opposition to set up Diesel Right | पंचवटी अमरधाम : डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध

पंचवटी अमरधाम : डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध

Next

पंचवटी : पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनी बसवू नये, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येऊन डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे.  सध्या या जागेत समाजातील अनेक कैलासवासी बांधवांच्या समाधी आहेत, सदर जागेची साफसफाई करत असताना काही समाधीची विटंबना झाली असून, या ठिकाणचे पिंपळ, कडूनिंब तसेच चिंच हे वृक्ष तोडण्यात आल्याने समाजातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  निवेदनावर अनिल कोठुळे, रवींद्र अदयप्रभू, राजेश भोरे, प्रमोद हिंगमिरे, अण्णा कोठुळे, उमाकांत गवळी, सुनील कोठुळे, श्याम कोठुळे, अरुण चौगुले, सुनील कारेगावकर, उमेश आटवणे, मल्लिकार्जुन कोठुळे, संजय बनसोडे आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  पंचवटी विभागात ६ प्रभाग असून, वीरशैव लिंगायत समाजबांधवांसाठी पंचवटी अमरधाम येथे दफनभूमी आहे. भविष्यात विचार केला तर सदरची जागा अत्यंत कमी प्रमाणात असून, या दफनभूमीनजीक महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याचे कामकाज सुरू केले आहे.

Web Title:  Panchavati Amardham: Opposition to set up Diesel Right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.