पंचवटीत महाशिवरात्री साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:34 AM2019-03-05T01:34:25+5:302019-03-05T01:34:45+5:30

परिसरात असलेल्या शिवमंदिरांत सोमवारी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 Panchavati celebrated Mahashivratri | पंचवटीत महाशिवरात्री साजरी

पंचवटीत महाशिवरात्री साजरी

googlenewsNext

पंचवटी : परिसरात असलेल्या शिवमंदिरांत सोमवारी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जुना आडगाव नाक्यावरील श्री कृष्णतीर्थ आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री कृष्णतीर्थ आश्रम येथे सकाळी महंत १००८ श्री स्वामी रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते शिवमंदिरात विधीवत पूजन करण्यात आले त्यानंतर अभिषेक पूजन व महाआरती झाली. महाशिवरात्रीनिमित्ताने यजमानांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक झाला. दिवसभरात मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर संतवाणी डायरा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिरावाडीरोडवरील क्षीरसागर कॉलनी येथे असलेल्या श्री बेलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सोमवारी सकाळी बेलेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने विधीवत पूजन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नीलेश गजभार, मनीष गाडेकर, सौरभ नाडगौडा, पवन कदम, बंटी कापुरे, हर्षल गाडेकर, जगदीश दिघे, यतिन पाटील, पिंटू क्षीरसागर आदींसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भजनी मंडळाचा भजन गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
बाणेश्वराला जेजुरीच्या भंडाऱ्याचा अभिषेक
गंगाघाटावरील रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री बाणेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने जेजुरी येथून आणलेल्या भंडाऱ्याचा महादेवाच्या पिंडीला विधिवत अभिषेक पूजन करण्यात आले.
महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी जेजुरी येथील भंडाºयाने देवाला अभिषेक केला जातो. देवदर्शनासाठी जेजुरीला गेलेले भाविक भंडारा आणतात व त्याने अभिषेक पूजन केले जाते. सोमवारी परिसरातील भक्तांच्या वतीने बाणेश्वर महादेव आला. भंडाºयाचा अभिषेक करण्यात आला. सोमवारी महाशिवरात्री निमित्ताने शेकडो भाविकांनी बाणेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

Web Title:  Panchavati celebrated Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.