पंचवटीत रंगोत्सव उत्साहात; रहाडावर रंगप्रेमींची गर्दी, तरूणाईचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:35 PM2023-03-12T17:35:06+5:302023-03-12T17:37:55+5:30
शनि चौकातील पेशवेकालीन रहाडात यंदाही गुलाबी रंग तयार केला होता. रहाडात उड्या मारण्यासाठी शेकडोंच्या संख्येने रंगप्रेमींनी गर्दी तोबा केली होती.
संदीप झिरवाळ -
नाशिक : रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे, झुमका वाली पर, पाटलांचा वाडा, अशा विविध हिंदी मराठी, गीतांवर ठेका धरत पंचवटीत ठिकठिकाणी रविवारी (दि.12) पंचवटी परिसरात रंगपंचमी (रंगोत्सव) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमी निमित्त अबालवृद्धांनी आनंद लुटला. शनि चौकातील पेशवेकालीन रहाडात यंदाही गुलाबी रंग तयार केला होता. रहाडात उड्या मारण्यासाठी शेकडोंच्या संख्येने रंगप्रेमींनी गर्दी तोबा केली होती.
रविवारी पेशवेकालीन रहाड मानकरी असलेल्या दीक्षित कुटुंबातील सदस्याने विधिवत पूजन करत रंगाने भरलेल्या रहाडीच्या रंगात भिजल्यावर रंगप्रेमींना रहाड खुली करण्यात आली. यावेळी रहाडात धप्पा मारण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती रंगपंचमीनिमित्त बालगोपाळांनी डोक्यावर आकर्षक टोप्या चेहऱ्यावर आकर्षक मुखवटे परिधान केले होते. अनेक सार्वजनिक मित्र मंडळातर्फे पाण्याचे शॉवर लावले होते. रंग असलेल्या शॉवरखाली रंगप्रेमींनी भिजण्याचा आनंद लुटला.