पंचवटी एक्सप्रेस अडकली; दीड तास उशिरा पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 02:42 AM2022-06-21T02:42:52+5:302022-06-21T02:43:09+5:30

मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विलंब झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. 

Panchavati Express stuck; Arrived an hour and a half late | पंचवटी एक्सप्रेस अडकली; दीड तास उशिरा पोहोचली

पंचवटी एक्सप्रेस अडकली; दीड तास उशिरा पोहोचली

Next
ठळक मुद्देमालगाडीमुळे खोळंबा : मुंबईतून निघालेली गाडी आटगावला थांबली

नाशिक : मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विलंब झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. 
सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबईहून आपल्या निर्धारित वेळेत निघालेली पंचवटी एक्सप्रेस ७.४५ वा. आटगावजवळ येताच मार्गावरच गाडीला रेड सिग्नल मिळाला. या मार्गावर पुढे मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला थांबविण्यात आले. सुमारे सव्वा ते दीड तास गाडी या मार्गावरच अडकून पडल्याने गाडीला विलंब झाला. मालगाडीसाठी पर्यायी इंजिन उपलब्ध होण्यास बराच वेळ लागणार असल्याने पंचवटी एक्सप्रेसला आऊट लाईनवरून पुढे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आऊट लाईनवरील मार्गावरून गाडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मालगाडीची लांबी अधिक असल्याने मेनलाईनवर पंचवटी एक्सप्रेसला आणणेही कठीण झाल्याने पुन्हा गाडी थांबविण्यात आली. 
   अगोदरच विलंब त्यात पुन्हा आऊटलाईनवरूनही गाडी पुढे मार्गस्थ करणे शक्य नसल्याने प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळातच मालगाडीचे इंजिन सुरू झाले आणि मालगाडी निघाल्यानंतर त्यानंतर पंचवटी एक्सप्रेसला रवाना करण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार पंचवटी एक्सप्रेस रात्री ९.३६ वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येणे अपेक्षित असताना रात्री ११ वाजता गाडी नाशिकरोडला पोओचली.
  —इन्फो—
इतर गाड्यांनाही विलंब
पंचवटी एक्सप्रेसनंतर मुंबईहून धावणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले. जवळपास तासभर गाड्या उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडूनही तशी सूचना प्रवाशांना देण्यात आली. मुंबईहून येणाऱ्या  राज्यराणी, विदर्भ, पंजाबमेल, यासह इतर  गाड्या उशिराने धावत हेात्या. दरम्यान, पंचवटी एक्सप्रेस गाडीला विलंब झाल्याने दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांना दीड दोन तास गाडीतच अडकून पडावे लागले, अशी माहिती पंचवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे, रेल परिषदेचे सचिव देविदास पंडित यांनी दिली.

Web Title: Panchavati Express stuck; Arrived an hour and a half late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.