पंचवटी एक्स्प्रेसला आजपासून जोडणार नवे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:32 AM2018-05-09T00:32:27+5:302018-05-09T00:32:27+5:30
नाशिकरोड : नाशिककरांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवार (९ मे) पासून नवीन बोगीच्या रूपाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.
नाशिकरोड : नाशिककरांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवार (९ मे) पासून नवीन बोगीच्या रूपाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. नवीन रूपात येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचे बुधवारी सकाळी साडेसहाला नाशिकरोड रेल्वेस्थानकावर खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र पवार, भुसावळचे रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, नितीन चिडे तसेच या गाडीसाठी प्रयत्न करणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी आदी स्वागत करणार अहेत. पंचवटीच्या नवीन बोगींची बांधणी चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, गुरमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी आदींनी नवीन गाडीसाठी पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वीच येवला येथे दाखल झालेलया नवीन पंचवटी एक्स्प्रेसच्या २१ नवीन बोगींची पाहणी करण्यात आली होती. प्रवाशांची बैठक व्यवस्था आरामदायी असून, बोगीची आंतर्बाह्य रंग - रचना व कार्य नावीन्यपूर्ण आहे. सर्व कोचना बायोटॉयलेट देण्यात आले आहे.