पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस आज रद्द

By admin | Published: June 25, 2017 12:29 AM2017-06-25T00:29:43+5:302017-06-25T00:29:58+5:30

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रविवारी सकाळ-पासून सहा तासांचा मेगाब्लॉक असल्याने मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Panchavati, Godavari Express canceled today | पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस आज रद्द

पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस आज रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी सकाळ-पासून सहा तासांचा मेगाब्लॉक असल्याने मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून सुटणाऱ्या व जाणाऱ्या १३ रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावणार आहेत. ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या सहा लाईनवर पुलावर गर्डर बसविण्याचे काम  हाती घेण्यात आल्याने रविवारी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत ६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पादचारी पुलाच्या कामाकरिता ४.३० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. हावडा-मुंबई एक्स्प्रेस ही तिच्या साडेअकराच्या निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने दुपारी २ वाजता, राजेंद्रनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळ साडेअकरा ऐवजी दुपारी २ वाजता, गोरखपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वाबारा ऐवजी दुपारी २.२० वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वा बारा ऐवजी दुपारी १.४५ वाजता, वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी २ वाजता, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस निर्धारित वेळ दुपारी १.३० ऐवजी ३.३० वाजता, वाराणसी-सीएसटी मुंबई महानगरी एक्स्प्रेस दुपारी सव्वादोन ऐवजी ३.४५ वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ३.४५ वाजता, पाटलीपुत्र एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ४ वाजता मुंबईला पोहचणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ही रविवारी सकाळी निर्धारित वेळ १०.५५ ऐवजी १२ वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.१० ऐवजी १२.१५ वाजता, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.०५ ऐवजी ११.५० वाजता मुंबईहून सुटणार आहेत.
सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी सकाळी साडेसात वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर टर्मिनेट केली जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून नागपूरला रवाना होणार आहे.

Web Title: Panchavati, Godavari Express canceled today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.