पंचवटीत पुन्हा बिबट्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:41 AM2017-09-15T00:41:33+5:302017-09-15T00:41:38+5:30
हिरावाडी परिसर : नागरिक धास्तावले; अफवांना ऊत पंचवटी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हिरावाडी परिसरात असलेल्या पाटकिनारच्या भागात रात्रीच्या वेळी मुक्तपणे संचार करणाºया बिबट्याला वनविभागाने मेरी हायड्रोच्या परिसरात पिंजरा लावून जेरबंद केले असले तरी हिरावाडी परिसरात पुन्हा दुसºया बिबट्याचा संचार असल्याची चर्चा नागरिकांत पसरली असल्याने नागरिक पुन्हा बिबट्याच्या भीतीने धास्तावले आहेत.
हिरावाडी परिसर : नागरिक धास्तावले; अफवांना ऊत
पंचवटी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हिरावाडी परिसरात असलेल्या पाटकिनारच्या भागात रात्रीच्या वेळी मुक्तपणे संचार करणाºया बिबट्याला वनविभागाने मेरी हायड्रोच्या परिसरात पिंजरा लावून जेरबंद केले असले तरी हिरावाडी परिसरात पुन्हा दुसºया बिबट्याचा संचार असल्याची चर्चा नागरिकांत पसरली असल्याने नागरिक पुन्हा बिबट्याच्या भीतीने धास्तावले आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी परिसरात राहणाºया काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी मेरी हायड्रोच्या संरक्षित भिंतीवर बिबट्याने ठाण मांडलेले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिक बिबट्याच्या दहशतीच्या छायेत होते. परिसरात बिबट्याचा संचार असल्याची पुष्टी मिळाल्याने व पायांचे ठसे मिळाल्याने वनविभागाने मेरी परिसरातील मेरी हायड्रोच्या जलगती विभागात पिंजरा लावला होता. त्यानंतर सोमवारी (दि.११) पहाटे बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला.
हिरावाडी वज्रेश्वरीनगर पाटकिनारच्या भागात बिबट्याचा संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरल्याने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. वनविभागाने बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.
गेल्या दोन दिवसांपासून हिरावाडीतील मनपा क्रीडा संकुल पाटकिनारच्या परिसरात तसेच मेरी रासबिहारी लिंकरोडवर नागरिकांना पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. परिसरात बिबट्या असल्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसला तरी बिबट्या फिरताना बघितल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने सध्या तरी नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.