पंचवटीत मोकाट जनावरे रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:57 PM2019-10-27T23:57:40+5:302019-10-28T00:04:58+5:30
दिंडोरीरोड येथील पोकार कॉलनी तसेच कलानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत चालल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांना याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पंचवटी : दिंडोरीरोड येथील पोकार कॉलनी तसेच कलानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत चालल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांना याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दिंडोरीरोड रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील पोकार कॉलनी, कलानगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना विशेषत: लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. रस्त्याने ये-जा करताना यापूर्वी अनेक ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना जनावरांनी धडक देऊन जखमी केले आहे. त्यामुळे काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडल्याने परिसरात राहणाºया नागरिकांनी सांगितले.
याशिवाय नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने अनेकदा किरकोळ अपघात घडतात. या मोकाट जनावराबाबत वारंवार महापालिकेला तक्र ार करूनही त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कारवाईची मागणी
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार कोण? असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. मनपा प्रशासनाने मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकून संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी कलानगर पोकार कॉलनी परिसरात राहणाºया नागरिकांनी केली आहे.