हाणामारीच्या घटनांनी पंचवटीला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:21 AM2018-04-24T00:21:23+5:302018-04-24T00:21:23+5:30

पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत तलवारींचा सर्रास वापर करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

Panchavati quake triggers in the incident | हाणामारीच्या घटनांनी पंचवटीला हादरा

हाणामारीच्या घटनांनी पंचवटीला हादरा

Next

नाशिक : पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत तलवारींचा सर्रास वापर करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.  याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडी भागातील महाराष्टÑ कॉलनीमध्ये फिर्यादी अविनाश महावीर कौलकर (२०) हा युवक आपल्या मित्रासोबत उभा असताना संशयित किरण शेळके , नागेश शेलार, श्रीजय खाडे व त्यांचे दोन अनोळखी साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून जिवे ठार मारण्याचा कट रचून दुचाकीवरून येत तलवार व लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कौलकर याच्या डोक्यावर किरण याने वार केले तर नागेश याने लाकडी दंडुक्याने त्याच्या हातापायांवर मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच श्रीजय याने लोखंडी गज डोक्यावर मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल के ला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही संशयिताला पोलिसांनी अटक केलेली नसून पोलीस परिसरात त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक इंगोले करीत आहेत. दुसऱ्या घटनेत हनुमानवाडी लिंकररोडवरील एका लॉन्ससमोर चारचाकी मोटारीचे इंधन संपल्याने फिर्यादी प्रसाद देवीदास शिंदे (२१, रा. शांतीनगर) हा युवक त्याचा मावसभाऊ विनायक शशिक ांत जाधव तवेरा मोटारीतून (एमएच १४, एएम ४०८२) खाली उतरले. दोन दुचाकीवरून (एमएच १५, एफआर ४५२४) आलेल्या एकूण चार अज्ञात इसमांनी कुठलेही कारण नसताना त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दंडुक्याने शिंदे व जाधव यांना जबर मारहाण क रून फ्रॅक्चर केले तसेच मोटारीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी दोन दुचाकींचा गुन्ह्यात वापर केला असून, दुसºया दुचाकीचा क्रमांक पोलिसांना उपलब्ध झाला नाही.
पंचवटीत गुन्हेगारीचा उद्रेक
पंचवटी परिसरातील हनुमानवाडी, तारवालानगर, मखमलाबाद लिंकरोड परिसर, दिंडोरीरोड, हिरावाडी, पंचवटी कारंजा परिसरात मागील काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या युवकांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा लुटीच्या इराद्याने मारहाणीच्या घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

Web Title: Panchavati quake triggers in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.