पंचवटीत पावसाने भाजीबाजारात पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:09 AM2019-07-02T01:09:39+5:302019-07-02T01:10:12+5:30
तब्बल तीन आठवड्यांनंतर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी पंचवटीकरांना चांगलेच झोडपून काढल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते.
पंचवटी : तब्बल तीन आठवड्यांनंतर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी पंचवटीकरांना चांगलेच झोडपून काढल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर कायम असल्याने पावसामुळे नागरिकांची व शाळेतून घरी परतणाºया शालेय विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक तासभर मंदावली होती.
पंचवटीतील काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर तसेच नागरी वसाहतीत पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाचा जोर सायंकाळी ६ वाजेनंतरदेखील कायम असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाºया नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागल्याचे चित्र दिसून आले. पावसामुळे पंचवटी परिसरातील गावठाण तसेच खोलमय रस्ते असलेल्या भागात पावसाचे पाणी साचले होते.
दर आठवड्याला हिरावाडीतील कमलनगरला भरणारा आठवडे बाजार सायंकाळी पूर्णपणे विस्कळीत झाला होता. पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने जोरदार सलामी दिल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या शेकडो ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच नागरिकांची धावपळ उडाली ऐन गर्दीच्या वेळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने सायंकाळी हजारो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.