पंचवटी, राज्यराणी तीन दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 01:33 AM2022-06-22T01:33:36+5:302022-06-22T01:33:55+5:30

मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

Panchavati, Rajyarani canceled for three days | पंचवटी, राज्यराणी तीन दिवस रद्द

पंचवटी, राज्यराणी तीन दिवस रद्द

Next
ठळक मुद्देरेल्वे रूळ दुरुस्तीचे काम : येत्या शनिवारपासून मंगळवारपर्यंत ब्रेक

नाशिक रोड : मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

मनमाड-मुंबई रोज येणारी-जाणारी नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी शनिवार (दि. २५) जूनपासून ते मंगळवार २८ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईला जाताना पंचवटी सुरू आहे. मात्र, या दिवशी मुंबईहून नाशिकला येताना ती रद्द करण्यात आली आहे. जनशताब्दीदेखील या काळात बंद राहील.

मुंबईला जाणारी नंदीग्राम २६ आणि २७ जूनला, तर मुंबईहून सुटणारी २७ आणि २८ जूनला, नांदेडहून मुंबईला जाणारी राज्यराणी २६ आणि २७ जूनला; तर मुंबईहून नांदेडला जाणारी राज्यराणी २७ आणि २८ जूनला रद्द आहे. मात्र दरम्यान पंचवटी नाशिकला पाणी भरण्याची सुविधा आहे. चार नंबरचा प्लॅटफॉर्म खाली राहत असल्याने गाडी कोठे उभी करायची, हा प्रश्नही निकाली निघतो. त्यामुळे पंचवटी नाशिकरोडहून सोडावी, अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, संजय शिंदे, रमेश फुलमाळी, सुदाम शिंदे, दीपक कोरगावकर, दत्ताराम गोसावी, उज्ज्वला कोल्हे, आदींनी केली आहे. पंचवटी रद्द केल्याने चार दिवस चाकरमाने, व्यावसायिक, व्यापारी, अधिकारी, कामगार, विद्यार्थी यांनी मुंबई व ठाण्याला दररोजप्रमाणे जायचे व यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Panchavati, Rajyarani canceled for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.