पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:39 AM2019-08-06T01:39:37+5:302019-08-06T01:40:27+5:30

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

 Panchavati, Rajyarani canceled three railway trains | पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

googlenewsNext

नाशिकरोड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.
मुंबई-ठाणे परिसरात शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन रेल्वे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वे धावूशकली नाही. कोलमडलेले रेल्वे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी सोमवारी मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, अप-डाउनची मुंबई भुसावळ पॅसेंजर, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही सोमवारी आपल्या निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना झाली.
रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आलेली गोरखपूर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी नाशिकरोडहून पुन्हा गोरखपूरला रवाना करण्यात आली. मुंबईहून येणाºया वाराणसी, गीतांजली, तपोवन, हरिद्वार, बरेली, पुष्पक या रेल्वे सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.
सोमवारी सकाळी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई - काजीपेठ एक्स्प्रेस या दोन रेल्वे आपल्या निर्धारित वेळेतच धावल्या.
रविवारी मुंबईला जाणाºया पठाणकोट, पवन एक्स्प्रेस, वाराणसी, दुरांतो एक्स्प्रेस दहा ते पंधरा तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या. कोलमडून गेलेले रेल्वेचे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरी बहुतांश रेल्वे उशिराने धावत असल्याने, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
शहर बसेसवा पूर्ववत
मुसळधार पावसामुळे शहरातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आलेल्या शहर बसेस दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. दिवसभर सुरू असलेली संततधार तसेच नदीला आलेल्या पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बंद करण्यात आलेल्या बसेस सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर पूर्ववत करण्यात आल्या.
४रविवारी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांना पाणी लागल्यामुळे तर काही मार्ग खचल्यामुळे पेठ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली.

Web Title:  Panchavati, Rajyarani canceled three railway trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.