पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत दोनच विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:33 AM2018-03-01T01:33:23+5:302018-03-01T01:33:23+5:30

पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत अवघ्या दोन विषयांच्या कामांना दोन मिनिटांत मंजुरी देण्यात आली. पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२६) बैठक झाली.

Panchavati ward committee meeting approved two subjects | पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत दोनच विषयांना मंजुरी

पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत दोनच विषयांना मंजुरी

Next

पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत अवघ्या दोन विषयांच्या कामांना दोन मिनिटांत मंजुरी देण्यात आली. पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२६) बैठक झाली. मनपा प्रशासनकडून केल्या जाणाºया विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सोहळ्याला अधिकारी प्रभागातीलच नगरसेवकांना डावलत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे. पंचवटी परिसरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सुरू केल्या असल्या तरी त्या घंटागाड्या अन्य प्रभागात फिरतात. रस्त्यावर कचरा टाकून परिसरात दुर्गधी पसरविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित सदस्यांनी केली. प्रभाग क्र मांक २ मध्ये गेल्या आठवड्यात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले मात्र या कामाच्या भूमिपूजनाला स्थानिक नगरसेवक असतानाही बोलविले नाही. प्रभागातील काही नागरिकांनी भूमिपूजन कार्यक्र माची माहिती दिली.
यापूर्वीदेखील अशाचप्रकारे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्याला डावलले असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवक पूनम सोनवणे यांनी केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीतील चर्चेत नगरसेवक सुरेश खेताडे, रूचि कुंभारकर, सरिता सोनवणे, नंदिनी बोडके, पूनम मोगरे, विमल पाटील, भिकूबाई बागुल, शांता हिरे, पाणी पुरवठ्याचे आर. एम. शिंदे, आरोग्याचे संजय दराडे, बांधकामचे नितीन पाटील, राहुल खांदवे आदींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Panchavati ward committee meeting approved two subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.