पंचवटी प्रभाग बैठक : ३८ लाखांच्या कामांना मंजुरी प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:49 AM2018-01-01T00:49:21+5:302018-01-01T00:50:03+5:30
पंचवटी : पंचवटी विभागात अनियमित घंटागाडी येते म्हणून प्रशासन उशिराने येणाºया घंटागाड्याबाबत कारवाई करून दंड वसूल करते, मात्र प्रशासनाने अचिव्ह पॉइंट बंद करून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी, अशी मागणी पंचवटी प्रभाग समिती बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे.

पंचवटी प्रभागाची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या बैठकीत ३८ लाख रु पयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. पंचवटी विभागातील अनेक प्रभागांत नियमितपणे घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागतो. घंटागाडीवर काम करणाºया कर्मचाºयांना वेतन वेळेवर मिळत नाही, बूट नाहीत, तसेच तोंडावर लावण्यासाठी मास्क मिळत नसल्याची तक्र ार नगरसेवक शांता हिरे, सुरेश खेताडे, उद्धव निमसे, पूनम मोगरे यांनी केली. प्रभाग क्र मांक ५ मध्ये मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रशासन आठवड्यातून डॉग व्हॅन पाठविल्याचे सांगते मात्र प्रत्यक्षात डॉग व्हॅन येत नसल्याचे तक्र ार कमलेश बोडके यांनी केली, तर वाल्मीकनगर परिसरात पथदीप बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रा. सरिता सोनवणे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीतील चर्चेत नगरसेवक शीतल माळोदे, भिकूबाई बागुल, नंदिनी बोडके, विमल पाटील, पूनम सोनवणे, विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे, आर. एम. शिंदे, राहुल खांदवे, संजय गोसावी आदींनी सहभाग नोंदविला होता.