पंचवटीत पावसाने आठवडे बाजार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:19 AM2019-09-26T01:19:19+5:302019-09-26T01:19:42+5:30
शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. बुधवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला झालेल्या जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले होते.
पंचवटी : शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. बुधवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला झालेल्या जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने गंगाघाटावर भरणारा बुधवारचा आठवडे बाजार पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला विक्रे त्यांसह भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ झाली. बुधवार असल्याने नेहमीप्रमाणे म्हसोबा महाराज, गौरी पटांगणासह गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर दाटीवाटीने बाजार भरला होता.
मात्र पाच वाजता पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने बाजारात आलेल्या नागरिकांची, विक्रे त्यांची पळापळ होऊन बाजार विस्कळीत झाला. आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने बाजारात काहीकाळ हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.