पंचायत राज समितीने घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:03+5:302021-08-29T04:18:03+5:30

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामाबद्दलही समितीने समाधान व्यक्त केले. सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागाच्या कामाचा विशेष उल्लेख त्यांनी ...

Panchayat Raj Samiti took action against the officials | पंचायत राज समितीने घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

पंचायत राज समितीने घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

Next

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामाबद्दलही समितीने समाधान व्यक्त केले. सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागाच्या कामाचा विशेष उल्लेख त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी चार वाजता समितीचे कामकाज आटोपल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला.

चौकट=====

रिक्त पदे भरण्याची मागणी

या वेळी पंचायत राज समितीला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने निवेदन देवून, जिल्हा परिषदेचे सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांचे शासन स्थरावर वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेले प्रश्न सोडविण्याची मागणी केली. समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, सचिव विलास आठवले यांना दिलेल्या निवेदनात रिक्त पदांची भरती करून कर्मचाऱ्यावरील अतिरिक्त ताण कमी करणे, बक्षी समिती खंड दोन अहवाल प्रकाशीत करून जिल्हा परीषदेचे लिपीक,लेखा, ग्रामसेवक, पशु चिकीत्सा, नर्सेस, आरोग्य सेवक, औषध निर्माण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अंगणवाडी सुपरवायझर, विस्तार अधिकारी ( ग्रां. पं., कृषी, शिक्षण ), आरोग्य सेवक, शिक्षक, मुख्याध्यापक स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता, वाहनचालक, परीचर यांचे आयोगातील त्रुटी दुर करणे, उत्कृष्ठ कार्य करणारे आदर्श व गुणवंत कर्मचारी यांना पुर्वी प्रमाणे आगावु वेतन वाढीची प्रथा सुरु करणे, केंद्राप्रमाणे वेतन भत्ते लागू करून जानेवारी २०२० पासून थकीत महागाई भत्ता अदा करणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अरुण आहेर, डॉ. भगवान पाटील, महेंद्र पवार, कैलास वाघचौरे, शोभा खैरणार आदी उपस्थित होते.

Web Title: Panchayat Raj Samiti took action against the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.