पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी आपल्या दारी

By Admin | Published: March 27, 2017 12:55 AM2017-03-27T00:55:34+5:302017-03-27T00:55:46+5:30

येवला : येवला पंचायत समितीने सदस्य आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ केला.

Panchayat Samiti officer, office bearer your ward | पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी आपल्या दारी

पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी आपल्या दारी

googlenewsNext

येवला : गावपातळीवर सर्वसामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन, संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून गावातील सर्वसामान्य कुटुंबापर्यंत प्रत्येक विभागातील योजेनचा लाभ कसा देता येईल या उद्देशाने येवला पंचायत समितीने सदस्य आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ केला. पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, आरोग्याचे कर्मचारी यांना सर्वांना सोबत घेऊन गावात बैठकांचे आयोजन केले. सुरुवात आडगाव चोथवा येथे बैठक घेऊन करण्यात आली आहे.  लोकांनी शौचालयाचा वापर करणे, शौचालय बांधणे काळाची गरज आहे. छोटी-छोटी उदाहरणे देऊन हसत- खेळत गटविकास अधिकारी सुनील अहीरे यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पंतप्रधान आवास घरकुल योजना, रमाबाई घरकुल योजना, समाजकल्याणच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पंचायत समिती करणार असल्याचे प.स.सदस्य प्रविण गायकवाड यांनी सांगितले. वृद्ध व्यक्तींना श्रावणबाळ योजनेचा लाभ कसा घेता येईल, याचे कागदपत्रे कसे करावे याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस पाटील नारायण खोकले, सरपंच रामदास पवार, सुभाष खोकले, गोरख खोकले, रमेश घोडेराव, साळी, मोहन माळी, ईश्वर माळी आदी उपस्थित होते. महिलांचा मोठा सहभाग होता. कार्यक्र माचे सुत्रसंचालन ग्रामसेवीका सविता पवार यांनी केले. आभार किरण माळी यांनी मानले. (वार्ताहर)

 

Web Title: Panchayat Samiti officer, office bearer your ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.