न्जिल्हा परिषदेला पंचायतराज पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:32 AM2020-03-10T00:32:54+5:302020-03-10T00:34:20+5:30
नाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये राज्यात घेतलेल्या पंचायत राज पुरस्काराच्या स्पर्धेत नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, शासनाने प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांचीही निवड केली आहे. यापूर्वीच कळवण व इगतपुरी या दोन पंचायत समित्यांची देखील शासनाने पुरस्कारासाठी निवड केली आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रामुख्याने केल्या जाणाºया कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. जिल्हा परिषदेला प्राप्त होणाºया तक्रारी, निवेदने, बैठकांचे इतिवृत्त, शासन दरबारी केल्या जाणारा पत्रव्यवहार, कर्मचाºयांच्या सेवा पुस्तकांची नोंद, फाइलींचा निपटारा अशा प्रकारे प्रशासकीय कामकाजाची पंचायत राज व्यवस्थेत पाहणी केली जाते. शासनाने सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या दप्तराची तपासणी केली असली तरी तब्बल वर्षभरानंतर त्याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यात नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद, तर नागपूर विभागातून वर्धा, औरंगाबाद विभागातून लातूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या पंचायत राज स्पर्धेत नाशिक विभागातून कळवण व इगतपुरी या दोन पंचायत समित्यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. पंचायत समित्यांनाही याच दिवशी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गुरुवारी वितरणगुरुवारी (दि. १२) मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.