वनप्रस्थ तालुक्यात पाचशे वृक्षांची लागवड करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 05:41 PM2019-06-27T17:41:47+5:302019-06-27T17:42:02+5:30
सिन्नर : तालुक्यातील वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर-घोटी महामार्गावरील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर परिसरात सोमवारी (दि.१) रोजी सकाळी ६ ते ९ यावेळात ५०० वृक्षांची लागवड करणार आहे.
सिन्नर : तालुक्यातील वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर-घोटी महामार्गावरील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर परिसरात सोमवारी (दि.१) रोजी सकाळी ६ ते ९ यावेळात ५०० वृक्षांची लागवड करणार आहे.
संस्था तीन वर्षापासून आई भवानी डोंगर परिसरात वृक्षारोपण करीत आहे. संस्थेचे स्वयंसेवक वर्षभर सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत झाडांचे संगोपनासाठी काम करतात. फाउंडेशन विविध संस्थेच्या सहकार्याने आई भवानी डोंगर परिसरात मिया वाकी या जपानी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण केले. पावसाने ओढ दिली, त्यात तालुका दुष्काळी अशा परिस्थितीत स्वयंसेवकांना सिन्नर येथील मोटारसायकल वरून पाणी आणून झाडे जगविण्याचे काम केले. यावर्षीदेखील १ जुलै रोजी संस्थेने सुमारे ५०० झाडे लावण्याची तयारी केलेली आहे.