अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:28 AM2017-10-13T00:28:25+5:302017-10-13T00:28:44+5:30
पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक : पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
परतीच्या पावसाने सलग पाच दिवस धुमाकूळ घातल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, तर सोयाबीन व तूर नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. कापणीला आलेला व कापणी करून ठेवलेल्या मक्याला पुन्हा तुरे फुटू लागले तर बाजरीच्या बाबतीतही तोच प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचे पीक पावसामुळे जमीनदोस्त होण्याची भीती आहे, भाजीपाल्याचीही हीच परिस्थिती असून, शेतकºयांना पाऊस नकोसा झालेला असताना गुरुवारी जिल्ह्यात २२५ मिलीमीटर, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नादंगाव, मालेगाव या चार तालुक्यांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत असले तरी, शासनाने अद्याप त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु अतिवृष्टी झाल्यास पीक पंचनामा करण्याची तरतूद असल्यामुळे प्रशासनाने तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टी न झालेल्या भागातही शेती पिकांचे नुकसान होत असल्याने याठिकाणीही पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.