पंचवटीत अनधिकृत दुकाने हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:51 PM2018-08-14T16:51:08+5:302018-08-14T16:51:26+5:30

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे.

In Panchvati, unauthorized shops were deleted | पंचवटीत अनधिकृत दुकाने हटविली

पंचवटीत अनधिकृत दुकाने हटविली

Next
ठळक मुद्देमेरी रासबिहारी लिंकरोडवर कारवाई



पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे.
मेरी रासबिहारी लिंकरोडवर असलेल्या एका खासगी प्लॉटवर गेल्या अनेक वर्षांपासून जागामालकाने भाडेतत्त्वावर अनधिकृत दुकाने थाटण्यास परवानगी दिली होती त्यानुसार पंचवीस ते तीस दुकानदारांनी दुकाने थाटून अनधिकृतपणे बांधकाम करत व्यवसाय थाटलेले होते. सदर जागेचा नकाशा व कोणत्याही प्रकारचा लेआउट मंजूर झालेला नव्हता तसेच महापालिका प्रशासनाचीदेखील संबंधित जागामालकाने कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. सदर बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकानांचे बांधकाम हटविण्याची कारवाई केली. शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम केलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले. मुख्य रस्त्याला लागूनच व्यावसायिकांची दुकाने थाटलेली होती. याठिकाणी फरसाण कारखाना, टायर दुकान, भंगार विक्रेते, रोलिंग शटर्स आदींसह विविध प्रकारची दुकाने अनधिकृतपणे उभारलेली होती. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दुकाने थाटल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
(फोटो आरवर ११ पंचवटी नावाने)

Web Title: In Panchvati, unauthorized shops were deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.