‘त्रिसुत्री’च्या अंमलबजावणीकरिता पाण्डेय ‘ऑन रोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:59+5:302021-03-18T04:14:59+5:30
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्यावर्षाप्रमाणेच मार्चपासून परिस्थिती भयावह होऊ नये, ...
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्यावर्षाप्रमाणेच मार्चपासून परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी प्रशासनाने हालचाली गतीमान केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर पाण्डेय यांनी बाजारपेठांना अचानकपणे भेट देत पायी पाहणी दौरा केला. यावेळी पाण्डेय यांना मास्कविना वावरणारे अगदी अपवादात्मक बोटावर मोजण्याइतके लोक आढळून आले. त्यांनी यावेळी संबंधितांना समज आणि मास्क देत तत्काळ सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्यास सांगितले. संध्याकाळी साडेसहा वाजेपासून रविवार कारंजा येथून पाण्डेय यांनी दंगलनियंत्रण पथकाच्या तुकडीसह सरकारवाडा, भद्रकाली पोलिसांच्या फौजफाट्यासह परिसरात पायी दौरा सुरु केला. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी मास्क लावून रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, शिवाजीरोड, शालिमार या बाजारपेठेत पाण्डेय यांनी दुकानांचेही निरिक्षण केले. यावेळी काही दुकानदारांना दुकानांमध्ये ग्राहकांची जास्त गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच ग्राहकांना तत्पर सेवा दिल्यास दुकानांमध्ये सामाजिक अंतर राखण्यास मदत होणार असल्याचेही पाण्डेय यांनी मेनरोड परिसरातील काही दुकानदारांना सांगितले.
----इन्फो---
‘पोलीस कमिश्नर आले, मास्क लावा रे....’
पाण्डेय यांनी सर्व लवाजम्यासह पायी पाहणी दौरा सुरु करताच मेनरोडवरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर विविध वस्तुंची विक्री करणाऱ्यांनी तत्काळ ‘पोली कमिश्नर पांडे साहेब आले, मास्क लावा रे’ असे म्हणत बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या गळ्यात लटकणारे तसेच खिशांमध्ये ठेवलेले मास्क घाईघाईने काढत तोंडावर लावण्याची तसदी घेतली.
---इन्फो--
आजी-आजोबांना दिला मास्क
धुमाळ पॉइंट येथे खरेदी करणाऱ्या एका वृध्द आजी-आजोबांनी तोंडावर मास्क लावलेला नसल्याचे लक्षात येताच पाण्डेय यांनी दोघांना मास्क देत हात जोडून नमस्कार करत ‘मास्क काढायचा नाही, तर लावायचा आहे’ असे सांगितले.
----इन्फो---
रिक्षा थांबवून केली पाहणी
मेनरोडवरुन प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होणाऱ्या एका रिक्षाला पाण्डेय यांनी थांबवून त्यामधील प्रवाशांनी मास्क लावला आहे की नाही, याची पाहणी केली. यावेळी रिक्षेत चिमुकलीसुध्दा मास्क लावून बसलेली आढळून आल्याने पाण्डेय यांनी तिला नवीन मास्क भेट दिला.
--इन्फो--
मनपाचे पथकही सोबत
पाहणी दौऱ्यादरम्यान पाण्डेय यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांचे पथकही सोबत घेतले होते. जेणेकरुन कोणी दुकानदार अथवा नागरिक कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करता येईल. मनपाचे कर्मचारी पावतीपुस्तकसोबत घेऊन सहभागी झाले होते.
---कोट---
मेनरोड बाजारपेठेत गर्दी जरी असली तरी मास्क न लावता वावरणारे लोक अपवादानेच नजरेस पडले. नाशिककरांनी ज्या पध्दतीने मास्कचा वापर सुरु केला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे. नाशिकरांनी कोरोनाला थोपविण्यासाठी ‘त्रिसुत्री’चा सातत्याने काटेकोरपणे पालन केल्यास ‘लॉकडाऊन’ची तर गरज भासणारच नाही, मात्र जे निर्बंध आहेत, तेदेखील शिथिल करण्याचा मार्ग मोकळा होईल, याचा मला विश्वास या पाहणी दौऱ्यादरम्यान वाटला. मास्कचा वापर न करता वावरणारे ‘सुपर स्पेडर’ असून त्यांना तत्काळ मास्क देत पोलिसांच्या वाहनातून थेट मनपा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले जाणार आहे. याबाबतच्या सुचना आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
----
फोटो- ९५/९२/९४
===Photopath===
170321\17nsk_31_17032021_13.jpg~170321\17nsk_32_17032021_13.jpg~170321\17nsk_33_17032021_13.jpg
===Caption===
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय ऑन रोड~पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय ऑन रोड~पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय ऑन रोड