पांडवलेण्यातील मोरांचे अस्तित्व धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:07 PM2018-07-05T12:07:40+5:302018-07-05T12:11:29+5:30

मोकाट कुत्र्यांकडून शिकार, पक्षीप्रेमींची नाराजी

Pandit peacocks peacock survival! | पांडवलेण्यातील मोरांचे अस्तित्व धोक्यात!

पांडवलेण्यातील मोरांचे अस्तित्व धोक्यात!

Next
ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांकडून शिकारपक्षीप्रेमींची नाराजी

संजय शहाणे
नाशिक/इंदिरानगर :
देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे पांडवलेणी परिसरातील वास्तव्य धोक्यात आले असून, महापालिकेकडून शहराच्या विविध भागातून पकडण्यात येणारे मोकाट श्वान पांडवलेण्याच्या परिसरात सोडले जात असल्याने या श्वानांकडून विशेष करून मोरांची शिकार केली जात असल्याचे आढळून आले आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दादासाहेब फाळके स्मारक उभारून परिसराचे सुशोभिकरण केले असताना त्याच परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले फाळके व बुद्ध स्मारक बघण्यासाठी विविध राज्यांतून आणि शहरातून दररोज शेकडो संख्येने पर्यटक हजेरी लावतात त्यामुळे पर्यटकांची येथे रेलचेल असते. पांडवलेणी डोंगराच्या परिसरात दाट जंगल असल्याने शेकडो मोर येथे वास्तव्यास असून त्यांचे दर्शन अनेक पर्यटकांना झाले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सकाळच्या सुमारास स्मारकाच्या लॉन्सवर व पांडवलेण्याच्या पायऱ्यांवर पिसारा फुलवून नृत्य करणारे मोरांचे नयनमनोहर दृश्य दररोज व्यायामासाठी येणाºया नागरिकांना बघायला मिळत असले तरी, त्यात दिवसेंदिवस मोरांची संख्या कमी होत चालल्याचेही दिसू लागले आहे. यामागे भटक्या श्वानांचे कारण पुढे आले असून, शहरातील विविध भागातून पकडलेले मोकाट श्वान महापालिकेकडून पांडवलेणी व खतप्रकल्पाच्या परिसरात सोडण्यात येतात. हे मोकाट श्वान फाळके स्मारक आणि पांडवलेणी परिसरात येत असून, त्यांच्याकडून मोरांची शिकार केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून पांडवलेण्याच्या परिसरात मृत्यू पावलेल्या मोरांचे अनेक ठिकाणी अवशेष सापडले आहेत. त्यामुळे मोरांचे अस्तित्व नष्ट होत असल्याबद्दल पक्षीपे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Pandit peacocks peacock survival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.