पुन्हा दिसू लागले फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:46+5:302021-03-25T04:15:46+5:30
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित नाशिक : जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या वातावरणामुळे उन्हाळ ...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
नाशिक : जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या वातावरणामुळे उन्हाळ कांदा पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला आहे.
कांदा दरातील घसरणीने नाराजी
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कांदा उत्पादनाचा खर्च वाढला असताना बाजारात मिळणाऱ्या दरामुळे उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे.
खासगी प्रवासी वाहनचालक अडचणीत
नाशिक : कोराेनामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, या व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे बँकेचे हप्तेही थकले असल्यामुळे बँकांचाही तगादा सुरू झाला आहे.
आठवडे बाजार बंद असल्याने समस्या
नाशिक : गावोगावचे आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणाला खीळ बसली आहे. अनेक छोटे व्यापारी आठवडे बाजारांच्या भरवशावर आर्थिक उलाढाल करत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाजार बंद असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सातनंतर पसरतो शुकशुकाट
नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठांमधील दुकाने रात्री सात नंतर बंद होत असल्याने बाजारांमध्ये शुकशुकाट पसरत आहे, मात्र काही भागातील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे दिसून येत आहे.
बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने नाराजी
नाशिक : शहर वाहतुकीच्या बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बसेसची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने नाराजी
नाशिक : शहरातील सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना गोंधळ उडत असून, काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. काही चौकांतील सिग्नल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, तर काही ठिकाणी दिवसभर सिग्नल बंद असतात. दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मार्चअखेरमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ
नाशिक : मार्चअखेरमुळे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये निधी खर्च करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दृश्य दिसून येत आहे. अडकलेली बिल काढण्यासाठी या कार्यालयांमध्ये ठेकेदारांची गर्दी होत आहे.