फलकांची दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:56+5:302021-06-02T04:12:56+5:30

नाशिक : महापालिकेच्यावतीने रामकुंड परिसरात स्वच्छता करण्यात येत असून रामकुंडात साचलेले शेवाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे रामकुंडातील ...

The panels should be repaired | फलकांची दुरुस्ती करावी

फलकांची दुरुस्ती करावी

Next

नाशिक : महापालिकेच्यावतीने रामकुंड परिसरात स्वच्छता करण्यात येत असून रामकुंडात साचलेले शेवाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे रामकुंडातील पाणी कमी करण्यात आले आहे. शेवाळामुळे भाविक पाय घसरून पडण्याच्या घटना घडत होत्या याबाबत अनेकवेळा स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या.

पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. सकाळी वातावरण चांगले असले तरी दुपारनंतर अचानक पाऊस येत असल्याने शेतीकामांत अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर ज्यांचे काढलेले कांदे अद्याप बाहेर आहेत त्यांना झाकण्यासाठी धावपळ करावी लागते.

क्रीडांगणांवर गवत

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून क्रीडांगण बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कँग्रेस गवत उगवले आहे. या क्रीडांगणांची साफसफाई करण्याची मागणी खेळाडूंकडून केली जात आहे.

डीपीच्या झाकणांची चोरी

नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपींना असलेल्या झाकणांची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक भुरटे चोर रात्रीच्यावेळी ही झाकणे चोरून नेतात. त्यामुळे डीपी उघड्या पडून पावसाळ्यात ते धोकेदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The panels should be repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.