पांगरी शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:42 PM2019-01-02T17:42:09+5:302019-01-02T17:43:12+5:30
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. वावी केंद्र अंतर्गत येणाऱ्या अकरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.
पंचायत समिती सदस्य रवी पगार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी दिलीप पवार, वावी केंद्र प्रमुख कुसुम निकुंभ, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, मुख्यध्यापक अशोक बोराडे, स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष संदीप पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, शाखाध्यक्ष बारकू पगार, छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर, ग्रामपंचायत सदस्य विलास निरगुडे, संपत पगार, संदीप दळवी, निखील पांगारकर, देविदास बैरागी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पहिली ते चौथी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत धावणे, चित्रकला, वक्तृत्त्व, गीतगायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. दीपाली चांगटे, प्रतिभा सोनोवणे, वृषाली शेळके, स्वाती येवले, दीपाली शेलार, रवींद्र बैरागी, शरद धरम आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. दत्तात्रेय उगले यांनी सूत्रसंचालन केले. सचिन गांगवे यांनी आभार मानले. स्पर्धेत वावी, पांगरी बुद्रूक, पांगरी खुर्द, घोटेवाडी, कहांडळवाडी, दुसंगवाडी, निमोनीचा मळा, पिंपरवाडी, फुलेनगर, गोराणे वस्ती, वल्हेवाडी अशा अकरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.