पन्हाळसाठे पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी धनराज पालवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 06:45 PM2019-06-13T18:45:40+5:302019-06-13T18:52:51+5:30
येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली. पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत ९ पैकी पाच सदस्यानी पालवे यांच्या बाजूने मतदान केल्याने धनराज पालवे यांची निवड झाली.
येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली.
पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत ९ पैकी पाच सदस्यानी पालवे यांच्या बाजूने मतदान केल्याने धनराज पालवे यांची निवड झाली.
बबनराव पालवे, चांगदेव पालवे, संजय घुगे, संतोष पालवे, पर्वत घुगे, माधव नारायण सानप यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती.
यावेळी सरपंच धनराज पालवे, उपसरपंच सुवर्णा प्रदीप गांगुर्डे, सदस्य बाबाबाई पर्वत घुगे, परिगाबाई माधव सानप, सोनाली बबन मोरे आदि पाच सदस्यांनी मतदान केले. उर्वरित चार सदस्य गैरहजर राहिले. या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते अखेर निवडणूक सुरळीत पार पडली. या निवडणुकीसाठी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कोंडीलवार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामसेवक जे. वाय. हटकर, तलाठी सुलाने, रमेश पालवे, रायभान भुरे, गोरख पालवे, प्रदीप गांगुर्डे, शशीकांत बालवीर, अनिल मुंडे, राजाराम पाटील, सुरेश मुंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.