शहरातील तेरा प्रभागांत उद्या ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:37 PM2020-05-14T23:37:46+5:302020-05-14T23:41:02+5:30

दुरुस्तीच्या कारणांमुळे शहरातील सुमारे १३ प्रभागांत शनिवारी (दि.१६) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापलिकेने कळविले आहे. सातपूर आणि सिडकोे भागात शनिवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही.

'Panibani' in 13 wards of the city tomorrow | शहरातील तेरा प्रभागांत उद्या ‘पाणीबाणी’

शहरातील तेरा प्रभागांत उद्या ‘पाणीबाणी’

Next

नाशिक : दुरुस्तीच्या कारणांमुळे शहरातील सुमारे १३ प्रभागांत शनिवारी (दि.१६) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापलिकेने कळविले आहे. सातपूर आणि सिडकोे भागात शनिवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही.

या दोन्ही विभागांतील प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, कामटवाडे, मोगलनगर, साळुंकेनगर, वावरेनगर, शिवशक्ती चौक, आयटीआय परिसर, खुटवडनगर, मटालेनगर, जाधव संकुल व परिसरातील काही भाग त्याचप्रमाणे प्रभाग २७ मधील दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्तनगर, कारगील चौक, चुंचाळे गाव प्रभाग २८ मधील लक्ष्मीनगर, अंबडगाव, माउली लॉन्स या भागात पाणीपुरवठा होणार नाही.
नाशिकरोड विभागात गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातही दुरुस्तीमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील उपनगर, शांती पार्क, आरटीओ कॉलनी, आगर-टाकळी, समतानगर, जयभवानीनगर, रामदास स्वामीनगर, प्रभाग १७ मधील कॅनॉल रोड, नारायणबापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर त्याचप्रमाणे प्रभाग १८ मधील मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी व परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी व चेहेडी परिसर, एकलहरा रोड, सामनगाव, प्रभाग क्रमांक २० मधील डावखरवाडी, जयभवानी रोड, जेतवननगर, तरण तलाव परिसर, प्रभाग २१ सहाणे मळा, लवटे मळा, आर्टिलरी सेंटररोड, प्रभाग क्रमांक २२ मधील विहितगाव, सौभाग्यनगर, लॅमरोड, वडनेररोड तसेच प्रभाग २३ साईनाथनगर, अशोकामार्ग, लिंगायत कॉलनी, कल्पतरूनगर तर प्रभाग ३० मधील वडाळागाव, वडाळा गावठाण येथे पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाने कळविले आहे.

Web Title: 'Panibani' in 13 wards of the city tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.