असोली शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:12 PM2020-12-26T20:12:24+5:302020-12-27T00:34:54+5:30
पाळे खुर्द : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे.
पाळे खुर्द : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे.
वनविभागाने तात्काळ पंचनामा बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
पाळे खुर्द परिसरातील मळ्यामध्ये बिबट्याने अनेक कुत्रे खाल्याच्या घटना घडल्यामुळे परिसरातील गावात बिबटयाच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणविभागाने तात्काळ पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
पाळे खुर्द येथील मनोहर नवसा पाटील यांच्या मळ्यातील गोठ्या मध्ये जरशी जातीच्या गाईचे चार महिन्याचे वासराला रात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, असोली शिवारात कित्येक दिवसा पासून बिबट्यांने दहशद माजवत अनेक कुत्रे , फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे घबराटीचे वातावरण पसरले आहे वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरु आहे. त्यात आठवड्यात लोड शेडिंगमुळे तीन ते चार दिवस रात्रीची लाईट असल्याने कांद्याला पाणी भरण्यास शेतमजूर कामाला येत नाही शेतकऱ्याला स्वतः रात्री जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्यास रात्री कडाक्याच्या थंडीत व बिबट्यांच्या दहशतीत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्वरित बिबट्याला जेर बंद करण्याची मागणी पाळे खुर्द,पाळे बुद्रुक,असोली कळमथे, हिगवे, बर्डे परिसरातील शेतकरी बांधवांनी होत आहे