भेंडाळी शिवारात बिबट्याची दहशत
By admin | Published: May 23, 2017 02:01 AM2017-05-23T02:01:03+5:302017-05-23T02:01:24+5:30
सायखेडा : भेंडाळी-औरंगपूर शिवेवर आठ दिवसांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून, बिबट्याने परिसरातील अनेक कुत्री फस्त केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : भेंडाळी-औरंगपूर शिवेवर आठ दिवसांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून, बिबट्याने परिसरातील अनेक कुत्री फस्त केली आहेत. करंजगाव शिवारालगत हा भाग असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कडवा पाट जवळच असल्याने दाट झाडी आहे़ त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी योग्य वातावरण आहे. मात्र बिबट्याला भक्ष मिळत नसल्याने तो मानवी वस्तीकडे त्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने मोर्चा वळविल्याने या भागात दहशत निर्माण झाली आहे. या ठिकाणी वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनसेवक भैया शेख, दत्तू अहेर, रामचंद्र गंडे, विजय लोंढे, पिंटू निहारे आदींनी भेट देत पिंजरा लावला खरा; मात्र दिवसेंदिवस बिबट्याचे होणारे हल्ले लक्षात घेऊन वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरून आहे.