तीन बिबट्यांच्या दर्शनाने नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 04:08 PM2020-02-13T16:08:37+5:302020-02-13T16:08:48+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका बैलावर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गावाजवळील जनता विद्यालयाजवळील नागरी वस्तीत गुरूवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तीन बिबट्यांचे दर्शन झाले.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका बैलावर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गावाजवळील जनता विद्यालयाजवळील नागरी वस्तीत गुरूवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच सकाळच्या सञात शाळेत जाणारे विद्यार्थी भयभीत झाले असून वनविभागाने याकडे लक्ष देवून या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बेलगाव कुºहे येथे सकाळी-सकाळी शेतकरी शेतावर घाईघाईने जायला निघतात, शाळकरी मुले शाळेत जायला घराबाहेर पडतात, घरातील गृहिणी अंगण झाडायला घराबाहेर अंगणात येतात तेव्हा अचानक तीन- तीन बिबटे दृष्टीस पडतात तेव्हा भयभीत नागरिकांची काय भंबेरी उडते ते कालच्या घटनेवरून लक्षात येते. पहाटेच्या झोपेच्या तंद्रीत असल्यानंतर अचानक गल्लीच्या रस्त्यावर बिबटे दिसल्यानंतर श्वास रोखून जीवाच्या आकांताने घरात शिरून घाईघाईने दरवाजा बंद करतांना अनेक नागरिकांची अक्षरश: दमछाक झाली.यावेळी जनता विद्यालयाजवळ तीन बिबटे असल्याची बातमी परिसरात वा-यासारखी पसरल्यामुळे येथे नागरिकांनी बिबटे पाहण्यासाठी गर्दी केली होती परंतू नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर तीनही बिबटे जवळच असलेल्या लष्करी हद्दीच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र सकाळी सकाळी बिबटयांचे गुरगुरणे व डरकाळ्या ऐकून जणू काही काळच आला होता की काय असा प्रत्यय आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी आपल्या प्रतिक्रि येतून सांगितले आहे.मागील काही दिवसांपूर्वी याच बिबटयांनी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात नांदूरवैद्य, साकुर, नांदगाव बुद्रुक, अस्वली, बेलगाव कुर्हे, कुर्हेगाव, गोंदे दुमाला, घोटी खुर्द, येथील नागरी वस्तीत बिबट्याची दहशत वाढविली आहे. मागील वर्षी येथील माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्रीच्या शेडमधून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. यानंतर गेल्या दोन ते तीन मिहण्याच्या कालावधीत बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या पाच ते सहा घटना या परिसरात घडल्या असून परिसरातील नागरिक दिवसा कामासाठी बाहेर निघण्यास घाबरत आहेत. यासाठी यिकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देवून लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.