पंकज पारिख नाशिकमधील 'गोल्डमॅन'

By Admin | Published: July 20, 2016 06:36 PM2016-07-20T18:36:09+5:302016-07-20T18:36:09+5:30

ओरिजिनल गोल्ड मॅन दत्तात्रय फुगे यांची नुकतीच हत्या झाल्यानंतर आता नाशिकचे पंकज पारिख हे गोल्डमॅन चर्चेत आले आहेत. पंकज पारिख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा

Pankaj Parikh from 'Goldman' in Nashik | पंकज पारिख नाशिकमधील 'गोल्डमॅन'

पंकज पारिख नाशिकमधील 'गोल्डमॅन'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 20 - ओरिजिनल गोल्ड मॅन दत्तात्रय फुगे यांची नुकतीच हत्या झाल्यानंतर आता नाशिकचे पंकज पारिख हे गोल्डमॅन चर्चेत आले आहेत. पंकज पारिख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली आहे.

नाशिकच्या येवला भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर असलेले पारिख व्यावसायिक आहेत. त्यांनी १० किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला आहे व जगातील सर्वाधिक महागडा शर्ट अशी नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे. पारिख हा शर्ट घालतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी सहा बॉडीगार्ड असतात.या शर्टचे डिझाईन त्यांनी दुबईतून बनवून घेतले व नाशिकच्या बाफना सराफांनी तो बनविला. त्यासाठी १९ कारागिर दोन महिने काम करत होते. या शर्टबरोबरच पारिख सोन्याच्या भल्या जाडजूड चेन्स, सोन्याचे घड्याळ, सोन्याची चष्मा फ्रेम, सोन्याचे मोबाईल कव्हर अशा अ‍ॅक्सेसरीजही वापरतात.

आपल्या या शौकाबद्दल ते म्हणतात मी दुर्गम भागातला साधारण माणूस आहे. माझ्या या शौकामुळे माझ्या छोट्याशा गावाचे नांव जगात पोहोचले याचा मला अभिमान आहे.

Web Title: Pankaj Parikh from 'Goldman' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.