म-हळच्या खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:12 PM2018-05-10T17:12:22+5:302018-05-10T17:12:22+5:30
शैलेश कर्पे/सिन्नर : प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील म-हळ परिसरातील तीन गावातील ग्रामस्थ गाव बंद करुन देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे आज शुक्रवार (दि. ११) रोजी रवाना होत आहेत.
शैलेश कर्पे/सिन्नर : प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील म-हळ परिसरातील तीन गावातील ग्रामस्थ गाव बंद करुन देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे आज शुक्रवार (दि. ११) रोजी रवाना होत आहेत. या अनोख्या सोहळ्यासाठी पांगरीकरांनी मानाचा आकर्षक रथ बनविला असून त्यात देव विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर रथासह म-हळ परिसरातील हजारों ग्रामस्थ जेजुरीकडे रवाना होणार आहेत. प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया म-हळ येथील यात्रोत्सवात व जेजुरीच्या देवभेटी सोहळ्यात पांगरीकरांच्या रथाला विशेष मान असतो. पांगरीचा रथ गेल्याशिवाय यात्रोत्सवात किंवा जेजुरीच्या देवभेटीच्या सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होत नाही. जेजुरी वारीसाठी पांगरी ग्रामस्थांनी सागवानी नवीन रथ बनविला आहे. म-हळ बुद्रुक, म-हळ खुर्द व सुरेगाव येथील ग्रामस्थ आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करुन जेजुरीला जाणार आहेत. जेजुरीच्या खंडेरायाला या गावातील ग्रामस्थ कधी एकट्यादुकट्याने किंवा कुटुंबासमवेत जात नाही. तर सर्व ग्रामस्थ एकाचवेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदैवतेच्या भेटीची आपली आगळीवेगळी परंपरा जपली आहे. यासाठी पांगरीकरांनी खास सागवानी रथ बनविला आहे. मºहळकरांना तब्बल पाच वर्षानंतर कुलदैवतेच्या दर्शनाचा योग आला आहे. यापूर्वी २००७ साली हजारों मºहळकर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन व घरांना कुलूप लावून जेजुरीला गेले होते. त्यानंतर २०१३ व आता २०१८ साली हा योग मºहळकरांच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी पांगरीकरांनी ७५ घनफूट सागवान वापरुन पाथरे येथील सोमवंशी बंधूंकडून आकर्षक असा रथ बनवून घेतला आहे. लोकवर्गणीतून पांगरी ग्रामस्थांनी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी जमा केला. त्यातून हा आकर्षक रथ साकारण्यात आला आहे.
----------------
दोन महिन्यांपासून रथ बनविण्याचे काम
पांगरी, मºहळ ब्रुद्रूक, म-हळ खुर्द, सुरेगाव व परिसरातील ग्रामस्थांची मºहळच्या खंडेरायावर खूपच भावना आहे. मºहळचा यात्रोत्सव असो की जेजुरीचा देवभेटीचा योग यात पांगरीच्या रथाला विशेष मान असतो. त्यामुळे पांगरीकरांनी यावर्षी जेजुरीच्या वारीसाठी आकर्षक सागवाणी रथ बनविला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच पांगरीकरांनी लोकवर्गणी जमा करुन रथ बनविण्याच्या कामास प्रारंभ केला होता. रथ पूर्ण झाला असून जेजुरीला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
-------------------
पांगरीत रथाची मिरवणूक
म-हळचा यात्रोत्सव असो की जेजुरीचा देवभेटीचा योग. पांगरी येथे रथाची भव्य मिरवणूक काढली जाते. गुरुवारी सायंकाळी पांगरी ग्रामस्थांनी या आकर्षक सागवाणी रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. पुढे बैलाची जोडी व सागवाणी रथात खंडेरायाची पालखी ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रथ म-हळकडे रवाना झाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मºहळ येथून रथ जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे. पुढे रथ आणि त्यामागे मºहळकरांच्या वाहनांचा ताफा असणार आहे. शुक्रवारी रात्री श्री क्षेत्र आळंदी येथे मुक्काम होईल. रविवारी जेजुरी मुक्काम होणार आहे. देवभेटीनंतर रथासह वारीत सहभागी झालेल्या भाविकांचे मंगळवारी पुन्हा पांगरी येथे आगमन होईल. त्यानंतर सर्वांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.