चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:25+5:302021-07-15T04:12:25+5:30
खोदकामामुळे जुने नाशकात मातीमिश्रित पाणी नाशिक : जुने नाशिक परिसरात सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना नळाद्वारे मातीमिश्रित पाणी पुरवठा ...
खोदकामामुळे जुने नाशकात मातीमिश्रित पाणी
नाशिक : जुने नाशिक परिसरात सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना नळाद्वारे मातीमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला असला तरी अन्य भागात गढूळ पाणी पुरवठा होतच आहे.
बाजारपेठेतील खोदकामाने वाहतूक विस्कळीत
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने बाजारपेठेत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या कामामुळे लाइट, पाणी, ड्रेनेज अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकाचवेळी रस्ते खोदण्यात आल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्मार्ट सिटी कामांच्या चौकशीची मागणी
नााशिक : महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, मेन रोड या रस्त्यांचे खोदकाम करताना कोणतेही पूर्वनियोजन करण्यात आले नसल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांनी केली आहे. या कामांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.