पोपडा देवीची पूजा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:47 AM2017-09-26T00:47:09+5:302017-09-26T00:47:18+5:30

जुन्या नाशकातील डिंगरआळीत पोपडा देवी वाड्यामध्ये दरवर्षी नवरात्रात अष्टमीस रात्री १२ वाजता होत असलेली पोपडा देवीची पूजा येथील वाडा मोडकळीस आल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या वर्षापासून बंद होणार असल्याचे कुलकर्णी कुटुंबीयांकडून कळविण्यात आले आहे.

Pappada will stop worshiping Goddess | पोपडा देवीची पूजा होणार बंद

पोपडा देवीची पूजा होणार बंद

googlenewsNext

नाशिक : जुन्या नाशकातील डिंगरआळीत पोपडा देवी वाड्यामध्ये दरवर्षी नवरात्रात अष्टमीस रात्री १२ वाजता होत असलेली पोपडा देवीची पूजा येथील वाडा मोडकळीस आल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या वर्षापासून बंद होणार असल्याचे कुलकर्णी कुटुंबीयांकडून कळविण्यात आले आहे.  दरवर्षी अष्टमीला रात्री १२ वाजता पोपडा देवीची पूजा होत असते व दुसºया दिवशी बारा वाजता उत्तरपूजा होऊन सांगता होत असते. गेल्या दीडशे वर्षांपासून अखंडितपणे ही परंपरा चालू आहे. मात्र ही पूजा होत असलेला वाडा आता जुना झाला असून, गेल्या काही महिन्यांत देवीच्या पूजास्थानाच्या आजूबाजूस बरीच पडझड झाली आहे. त्या कारणामुळे श्री पोपडा देवीच्या दर्शनास येणाºया भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सदर पूजा यावर्षीपासून विधीपूर्वक कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

Web Title: Pappada will stop worshiping Goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.