निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी
By Admin | Published: December 5, 2014 12:10 AM2014-12-05T00:10:26+5:302014-12-05T00:10:53+5:30
निफाडमध्ये अवतरली अवघी पंढरी
निफाड : येथील पुरातन श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार, कलशारोहण व ध्वजप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर देवस्थान संस्थानच्या वतीने सोमवारी (दि. १) सकाळी ८ वा. ‘श्री’ची व कळसाची सवाद्य मिरवणूक वाद्यवृंदासह निफाड शहरातून काढण्यात आली होती. या मिरवणुकीस श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत सजवलेल्या रथात श्री विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा, ध्वज, श्री संत नामदेव पायरी, गरुड, हनूमान मूर्ती, कासव प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीतील नाशिक येथील गुलालवाडी व्यायामशाळेच्या स्त्री-पुरुष कलावंतंच्या झांज पथकाने चांगलीच रंगत आणली व निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत अश्व, सजवलेल्या बैलगाड्या होत्या.