प्रभाग सभेत वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:41 AM2017-07-29T01:41:26+5:302017-07-29T01:41:26+5:30
: सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, अस्वच्छता व किटकनाशक फवारणी होत नसल्याच्या प्रश्नावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नाशिकरोड : सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, अस्वच्छता व किटकनाशक फवारणी होत नसल्याच्या प्रश्नावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये गावठाण, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था व तेथील अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. शौचालयाचे भांडे, दरवाजे, फरशा फुटल्या असून, स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी साचत असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताला आमंत्रण मिळत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
झाडांच्या आडव्या-तिडव्या अपघाताला आमंत्रण देणाºया फांद्या, पथदीप झाकून टाकणाºया झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत उद्यान विभागाकडून पर्यावरणाच्या नावाखाली टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याशिवाय इतर मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उडविली होती.
बैठकीला नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सरोज अहिरे, कोमल मेहरोलिया, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, संगीता गायकवाड, रंजना बोराडे, मीराबाई हांडगे, जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, संभाजी मोरुस्कर आदिंसह अधिकारी उपस्थित होते.