पारेगावला महाराजस्व अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:35 AM2018-10-26T00:35:07+5:302018-10-26T00:35:33+5:30
चांदवड : तालुक्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. फुल हार देऊन स्वागत करण्यापेक्षा दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल अहेर यांनी पारेगाव येथील महाराजस्व अभियाना प्रसंगी विस्तारीत समाधान योजना शिबीरात बोलतांना केले तर पारेगावसाठी मोठा सभामंडप २५१५या योजनेतुन देण्याचे आश्वासन दिले.

पारेगाव येथे पाराशर ऋृषीचा आश्रम असून येथे मोठा यात्रा उत्सवासाठी यात्रोत्सव क्षेत्रात मोठा निधी मिळवून देऊ असे आश्वासनही अहेर यांनी दिले. शिबीरास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे , तहसीलदार डॉ .शरद मंडलिक,नायब तहसीलदार मिनाक्षी गोसावी,वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, ज्ञानेश्वर सपकाळे, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कडाळे, पंचायत समितीचे सदस्य ज्योती भवर, सुनील शेलार, अॅड. शांताराम भवर, अशोक भोसले, मनोज शिंदे, सुभाष पुरकर, गणेश महाले, काका काळे,बाळा पाडवी, विलास भवर,बबन मंत्री आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होेते.