प्रहार संघटनेचा शहरातून मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:14 AM2017-07-29T01:14:30+5:302017-07-29T01:14:30+5:30
नाशिक : महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्या ठामपणे मांडत असताना मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अपंग बांधवास अपमानास्पद वागणूक व आमदार बच्चू कडू यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी (दि. २८) सकाळी प्रहार संघटना आणि प्रहार अपंग क्र ांती आंदोलनाच्या वतीने तोंडाला काळी फीत लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.
नाशिक : महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्या ठामपणे मांडत असताना मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अपंग बांधवास अपमानास्पद वागणूक व आमदार बच्चू कडू यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी (दि. २८) सकाळी प्रहार संघटना आणि प्रहार अपंग क्र ांती आंदोलनाच्या वतीने तोंडाला काळी फीत लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अपंग बांधव सहभागी झाले होते. शुक्र वारी जिल्हा रु ग्णालयासमोर गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चास सुरुवात झाली. यावेळी मनपा आयुक्तांनी एका अपंग बांधवाचा अपमान करत, प्रहार अपंग क्रांतीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्याशीदेखील उर्मटपणे असभ्य वक्तव्य करून, आयुक्तांनी आमदार कडू यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बच्चू कडू यांच्यावरील गुन्हा तत्काळ मागे घेण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मोर्चामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता जाधव, चंद्रभान गांगुर्डे, राजेंद्र अहेर, शेरूभाई मोमीन, सलीम काजी, भाऊसाहेब पवार, प्रकाश सरोदे यांच्यासह असंख्य अपंग बांधव सहभागी झाले होते.