भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:03 AM2018-04-09T01:03:54+5:302018-04-09T01:03:54+5:30

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे.

Parallel Markets of Filling: Haram Farmers Weekly Weekly | भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

भरेकऱ्यांचा समांतर बाजार : ‘ शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरात’ उद्देशाला हरताळ शेतकरी आठवडे बाजाराला अवकळा

Next
ठळक मुद्देशेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

नाशिक : ग्राहकांना शेतातील शेतमाल थेट आणि स्वस्त मिळावा यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रत्यावरील पांजरापोळच्या जागेत सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला अवघ्या चारच महिन्यांत अवकळा आली आहे. भरेकºयांनी या बाजाराला प्रथमपासून विरोध करीत सातत्याने बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने बाजाराच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला होता. आता भरेकºयांनी या बाजाराच्या जवळच महापालिकेच्या मोकळ्या जागेत आठवडे बाजार सुरू केल्याने शासनाचा शेतकरी आठवडे बाजार बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात येतो. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत होत्या. आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली जाते. १० ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारत नाही. या नोंदणीची संख्याही आता कमी झाल्याने नवीन शेतकरी सदस्य निर्माण झालेले नाही. त्यातच पूर्वीच्या नोंदणीकृत शेतकºयांनीदेखील शेतकरी आठवडे बाजारात बसणे परवडत नसल्याचे म्हटल्याने शेतकरी आठवडे बाजाराचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला होता. ग्राहकांनी एकीकडे बाजाराची संकल्पना स्वीकारली असताना दुसरीकडे शेतकरी बाजार सुरू झाल्यापासून स्थानिक भरेकºयांनी बाजार बंद पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्थानिक भरेकºयांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा करीत या भरेकºयांनी शेतकरी आठवडे बाजारात शिरून दोनदा बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर त्यांनी शेतकरी बाजाराच्या बाजूलाच रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पांजरापोळ, महापालिका आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अतिक्रमण विभागाचे वाहन वारंवार तैनात करावे लागत होते.

Web Title: Parallel Markets of Filling: Haram Farmers Weekly Weekly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार