समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:20 AM2018-03-13T00:20:47+5:302018-03-13T00:20:47+5:30

दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Is parallel road to transport or to the parking lot? | समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

Next

इंदिरानगर : दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची होणारी कोंडी लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी महामार्गाच्या दोन्ही बाजूस लाखो रु पये खर्च करून समांतर रस्ता करण्यात आला. समांतर रस्त्यालगतच सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरातील हजारो संख्येने राहणारे वाहनधारक शहरात ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगरचे प्रवेशद्वार असून, दीपालीनगरमधून ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना त्याचा वापर करावा लागतो. परंतु प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच तीन ते चार कंटेनर उभे राहतात. त्यामुळे वाहनधारकांना दीपालीनगर प्रवेशद्वारातून निघताना समांतर रस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. वादावादीचे प्रसंगही उद््भवत आहेत.  समांतर रस्त्यावरून मार्गक्र मण करणाºया वाहनधारकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार रस्त्यांवरच उभे राहणाºया कंटेनरधारकांविरु द्ध कोणती ठोस कारवाई होत नसल्याने शहर वाहतूक विभागाच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. समांतर रस्ता आणि दीपालीनगरमधून सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक होत असून, त्यांच्यावर आणि समांतर रस्त्यावर तासंनतास उभ्या राहणाºया कंटेनरधारकांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न नगरसेवक रूपाली निकुळे यांनी केला आहे.  समांतर रस्त्यावर उभे राहणाºया कंटेनरला सुमारे चाळीस ते पन्नास चाके असतात तसेच कंटेनरमध्ये असलेल्या सीमेंटच्या गोण्या दुसºया वाहनांमध्ये  चढ-उतार करताना मोठ्या प्रमाणात सीमेंट उडत असल्याने वाहनधारकांच्या डोळ्यात, नाकात त्याची धूळ जाऊन त्रास होत आहे.

Web Title: Is parallel road to transport or to the parking lot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.