त्र्यंबकनगरीत दृष्टिहिनांकडून ज्ञानेश्वरीचे पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 12:16 AM2021-12-12T00:16:36+5:302021-12-12T00:16:36+5:30

त्र्यंबकेश्वर : ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जीवनाचे सार सांगणारा ग्रंथ आहे. गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. डोळसांकडून या ग्रंथांची पारायणे होत असतील, परंतु दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरीतून ज्ञान व्हावे आणि मराठी भाषेचा गोडवा कळावा, या उद्देशाने त्र्यंबकेश्वरी माऊलीधामच्या सहकार्याने ब्रेल लिपीतून ज्ञानेश्वरी उपलब्ध करून देऊन पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.

Parayan of Dnyaneshwari from the visually impaired in Trimbaknagar | त्र्यंबकनगरीत दृष्टिहिनांकडून ज्ञानेश्वरीचे पारायण

त्र्यंबकनगरीत दृष्टिहिनांकडून ज्ञानेश्वरीचे पारायण

Next
ठळक मुद्देमाऊलीधामचा पुढाकार : ब्रेल लिपीतून ज्ञानेश्वरी ग्रंथ उपलब्ध

त्र्यंबकेश्वर : ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जीवनाचे सार सांगणारा ग्रंथ आहे. गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. डोळसांकडून या ग्रंथांची पारायणे होत असतील, परंतु दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरीतून ज्ञान व्हावे आणि मराठी भाषेचा गोडवा कळावा, या उद्देशाने त्र्यंबकेश्वरी माऊलीधामच्या सहकार्याने ब्रेल लिपीतून ज्ञानेश्वरी उपलब्ध करून देऊन पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.

समग्र भारत वर्षात प्रथमच अंध, दृष्टिहीन बांधवांसाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जे ज्ञानेश्वरी पाहू शकत नाही, ते ज्ञानेश्वरी वाचतात हा दिव्य अनुभव या पुण्य क्षेत्रावर ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीमुळे दृष्टीहिनांना आला. देवबाप्पा माऊलीधामचे प्रमुख महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज ऊर्फ फरशीवालेबाबा यांनी ब्रेल लिपित बनवून घेतलेल्या ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले.
ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया नाशिक शाखा यांनी या ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन माऊलीधाम आश्रमाच्या सहकार्याने केले. तीन दिवस चालणाऱ्या पारायणात ७५ अंध स्त्री-पुरुष भाविक पारायणात सामील झाले आहेत. रघुनाथदास महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे हभप संदीपन महाराज हासेगावकर,

ह.भ.प. संदीप महाराज जाधव, ब्लाइंड संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सहकारी दत्ता पाटील, निवृत्ती थेटे आदी यावेळी उपस्थित होते. अखेरीस संदीपान महाराज यांचे कीर्तन झाले.

लक्षवेधी सोहळा
तत्कालीन बाराव्या शतकातील मराठी भाषा दृष्टीहिनांना समजावी तसेच आध्यात्मिक जीवनाचा आनंद घेता यावा, यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये हा लक्षवेधी सोहळा सुरू आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा, या उद्देशाने संस्कृत (गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ब्रेल लिपीतही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून देण्यात आल्याने दृष्टिहिनांनाही त्याचा आस्वाद घेता येणार आहे.

फोटो- ११ त्र्यंबक ज्ञानेश्वरी

Web Title: Parayan of Dnyaneshwari from the visually impaired in Trimbaknagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.