खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी, मेंढी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:19 AM2019-06-12T01:19:22+5:302019-06-12T01:20:41+5:30
जोरदार वादळासह अल्प पावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी व मेंढी जागीच ठार झाली.
येवला : जोरदार वादळासह अल्प पावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून लाखो रु पयांचे नुकसान झाले. तसेच खिर्डीसाठे येथे वीज पडून शेळी व मेंढी जागीच ठार झाली. गेल्या तीन दिवसाप्रमाणे मंगळवारीही दहा ते पंधरा मिनिटे जोरदार वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामध्ये ममदापूर येथे जिजाबाई लहू साबळे यांच्या घराची भिंत पडून त्या जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता येवला येथे दाखल करण्यात आले आहे. खिर्डीसाठे येथे अर्जुन साबळे यांची मेंढी तसेच तुळशीराम पवार यांची शेळी वीज पडून ठार झाल्या. पिंपळगाव लेप मध्ये जन्याबाई पाडेकर यांच्या घराचे पत्र्याचे छत वादळामुळे उडाले. त्यात घरगुती सामानाचे नुकसान झाले. तसेच जन्याबाई व त्यांचा मुलगा विजय जखमी झाला. जऊळके येथे जाधव वस्तीवर पिंपळाचे झाड कोसळून नुकसान झाले.ममदापूरला अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत.